*नागनाथ ससाणे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित*
सामाजिक बांधिलकी जपत,
लोकशाही मजबूत करणाऱ्या पत्रकारांना विविध संस्थेकडून सन्मानित केले जाते.
उदगीर:तालुक्यातील किनीयल्लादेवी येथील रहिवासी असलेले पत्रकार नागनाथ ससाणे यांनी लेखणीच्या माध्यमातून शिक्षण, भ्रष्टाचार, आरोग्य, अवैध धंदे, गुंडगिरी,
नागरिकांच्या मूलभूत सुविधा,
अश्या अनेक समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून
निर्भीड, निपक्ष, निःस्वार्थपणे, प्रशासन दरबारी मांडण्याचे कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत
महाराष्ट्र पोलीस न्यूज २४, प्रथम वर्धापन दिनानिमित्त शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गतवर्षी नागनाथ ससाणे यांना मुंबई येथे शोध पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे नागनाथ ससाणे यांनी समाजामध्ये एक स्वतःची वेगळीच प्रतिमा,ओळख निर्माण केली आहे. हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा वार - बुधवार दि. ६ मार्च २४ रोजी मधुबन लॉन्स हडपसर पुणे, पुणे सोलापूर रोड येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष- सुहास सुरेश घटवाई (साम टि. व्ही. मुख्यनिवेदक) , उदघाटक- सई भोरे पाटील ( व्हॉइस प्रिन्सिपल पिटीसी नानव्हिज), प्रमुख उपस्थिती - अनिल टिळेकर माजी सभापती पंचायत समिती हवेली, मुख्यसंपादिका - स्मिता बाबरे, स्वातंत्र सैनिक- लिंबाजी कांबळे, पत्रकार - नागनाथ ससाणे, रामदास कांबळे, पवन हणमंते, निकिता लाडे, अंजली क्षीरसागर, यासह दिग्गज मान्यवरांच्या
प्रमुख उपस्थित संपन्न झाला. हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे नागनाथ ससाणे यांच्यावर त्यांच्या हितचिंतकांकडून, मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे. सूत्रसंचालन - निकिता लाडे, प्रास्ताविक - सुनील थोरात तर आभार - उदयकांत ब्राम्हणे यांनी मानले.


0 Comments