पत्रकार सुरेश पाटील नेत्र गावंकर यांना धक्काबुकी,पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल, आरोपींना पोलिसांनी केली अटक
उदगीर: शहरातील भाजी मार्केट पत्रकारास मारहाण झाल्याची घटना १० मार्च रोज रविवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी पत्रकार कायद्या अंतर्गत मराठवाड्यात पहिलाच उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्र गावंकर हे पेपर देण्यासाठी जात असताना आरोपीने एका इसमाला मारहाण करीत होता,तेव्हा पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावंकर यांनी का मारहाण करता असे विचारणा केली असता आरोपीने संगनमत करून,सुरेश पाटील यांना तू पत्रकार आहेस मी तुला ओळखतो माझ्या भानगडीत तू आलास तर तुला खतम करतो असे बोलून लाथाबुक्यानी मारहाण केली अशी फिर्याद सुरेश पाटील नेत्रगावंकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून दोघा आरोपीविरुद्ध गुरंन ७७/२४ कलम ३२३,५०४,५०६,३४ भादवी सह कलम ४ महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७ नुसार १० मार्च रोज रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास कटेकर हे करीत आहेत.


0 Comments