लातूर - उदगीर शिवशाही बसमधून १२ लाख ५० हजार रुपयांची चांदी लंपास..
लातूर ते उदगीर बसस्थानक दरम्यान शिवशाही बसमध्ये सिट खाली ठेवलेली १२ लाख ५० हजार रुपये किमतीची ज्यात २७ किलो ९३१ ग्रॅम चांदी असलेली बॅग चोरुन घेऊन गेले. या प्रकरणी रविवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी चारच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी ७:४० ते ९:३० या दरम्यान लातूर येथून उदगीर बसस्थानकात आलेल्या बस मधून अज्ञात आरोपीने फिर्यादी बसलेल्या शिवशाही बस मध्ये सीट खाली ठेवलेली २७ किलो ९३१ ग्रॅम चांदी ठेवलेली बॅग ज्याची अंदाजे किम्मत १२ लाख ५० हजार रुपये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे.
याप्रकरणी प्रताप प्रेमाराम देवासी (वय २२ वर्ष रा. चिल्लरगे यांचे घरी किरायाने, चिल्लरगे गल्ली सराफा लाईन उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२८६/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय सहिंता नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंलदास हे करीत आहेत.
0 Comments