तोगरी क्रास जवळील रायडर क्लब जुगारावर धाड; ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील मोघा उदगीर हैदराबाद राज्य मार्गावरील शिवारात तोगरी क्रास जवळील रायडर क्लबवर देवणी पोलीसांनी धाड टाकून परवान्याच्या उल्लंघन करुन जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले. या धाडीत पोलीसांनी रोख रक्कमेसह २ कोटी १३ लाख ७५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन रविवारी १० नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास देवणी पोलीस ठाण्यात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवणी पोलीसांनी शनिवारी ९ नोव्हेंबर रात्री अकराच्या सुमारास उदगीर - हैदराबाद राज्य मार्गावरील मोघा शिवारात तोगरी क्रास जवळील रायडर क्लब मोघा येथे धाड टाकून ५० आरोपीनी किरकोळ स्वरूपाचा संघटीत गुन्हा करून जिल्हाधीकारी लातूर यांनी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटीच चे उल्लंघन करून स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी वेळेची मर्यादाओलांडुन व नियमांचा भंग करून तिर्रट नावाचा जुगार पैशांवर खेळत व खेळवीत असताना नमूद आरोपी मुद्देमालासह मिळूनआल्याने त्यांनी जिल्हाधिकारी लातूर या लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केली.
याप्रकरणी पोलीस हेडकाँस्टेबल विष्णु गोपीनाथराव गुंडरे नेमणुक पोलीस स्टेशन चाकुर संलग्न उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, चाकुर) यांच्या फिर्यादीवरुन देवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं.३६०/२०२४ कलम २२३ व ११२ बी.एन.एस. सह कलम १२ (अ) ४.५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार काशिनाथ शिवकांत बाळे (रा. फुलार गल्ली उदगीर), गोपाळ बापुराव हुशारे (रा. लखनगांव ता. भालकी), (महेश शिवलींगअप्पा हालीखेडे (रा. बिदर) रतन विजयकुमार पाटील (रा. गणेश नगर उदगीर), परमेश्वर रामन गौड (रा. मिरपेठ हैद्राबाद), सोमनाथ विश्वनाथ राजुळे (रा. तोगरी ता. उदगीर) के. मोहन रामचंद्र (रा.बानसोहा जि. कामारेड्डी तेलंगणा) यांच्यासह एकुण ५० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीत तेलंगाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील जुगार शौकीनांचा समावेश आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर यांनी भेट दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गोंड हे करीत आहेत.
0 Comments