पोलीस उप महानिरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांच्या कडून चेक पोस्टची पाहणी
उदगीर:विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री साकेत मालवीय व निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री प्रमोद कुमार मंडल यांनी संयुक्तपणे उदगीर विधानसभा मतदार संघात दिनांक १० नोव्हेंबर रोजी भेट दिली.
सध्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रचार, भेटीगाठी यांचा वाढता जोर पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून ही भेट आयोजित करण्यात आली होती.
यावेळी दोन्ही निवडणूक निरीक्षक यांनी तादलापूर व शिरूर जानापुर या आंतरराज्य तपासणी नाक्यास भेट दिली. तसेच उदगीर स्ट्रॉंग रूम येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनीष कल्याणकर यांचे उपस्थितीत विधानसभा क्षेत्रातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक प्रचार कालावधी, मतदान प्रक्रिया दिवस व मतमोजणी प्रक्रिया दरम्यान स्थानिक पोलीस व बाहेरून उपलब्ध करण्यात आलेले निमलष्करी दलाच्या तुकड्या यांचे योग्य बंदोबस्त नियोजन करण्यात यावे. विधानसभा निवडणूक प्रचार मतदान व मतमोजणी या प्रक्रियेदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता योग्य त्या उपाययोजना करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
0 Comments