Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगिरातील मुसानगर येथे घरफोडी; ३ लाख २४ हजार ८०० रुपयांचे दागिने पळविले...

उदगिरातील मुसानगर येथे घरफोडी; ३ लाख २४ हजार ८०० रुपयांचे दागिने पळविले...

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील मुसानगर भागातील एकाच्या घराच्या दाराचा कोंडा तोडून कपाटातील चांदी सोन्याचे ३ लाख २४ हजार ८०० रुपयांचे दागिने पळविले. याप्रकरणी सोमवारी (२ डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १ डिसेंबर च्या रात्री शहरातील मुसानगर भागात अज्ञात आरोपीने फिर्यादी राहत असलेल्या घराचे दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश करून घरातील बेडरुममधील लोखंडी कपाटामध्यील ठेवलेले  एक तोळा वजनाचे ७० हजार रुपयांचे सोन्याचे जुने गलसर, व एक तोळा वजनाचे सोन्याचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे जुने गंठन, दिड तोळा वजनाचे २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे जुने नेकलेस, तीन ग्राम २१ हजर रुपये किमतीचे सोन्याचे जुने पता मनके, तीन ग्राम ७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील जुने झुमके, एक ग्राम वजनाचे २१ हजार रुपये किमतीचे नाकातील जुनी नतनी, तीस तोळे वजनाचे ३ हजार ५०० रुपये किमतीचे चादीची जुने चैन, पाच तोळे वजनाचे ३ हजार ५०० रुपये किमतीचे चादीचे जुने वाळे,, पाच तोळे वजनाचे २ हजार ८०० रुपये किमतीचे चांदीचे जुने चैन, चार तोळे वजनाचे २४ हजार ८०० रुपयांच्या चांदीचे ८ जुन्या अंगठया, असे एकुण ३ लाख २४ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले.
याप्रकरणी शेहबाबेगम मुबारक शेख (रा मुसानगर उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात