सोमनाथपूर येथे महसूल सप्ताहात लाभार्थ्यांना विविध योजनांची दिली माहिती
उदगीर:महसूल सप्ताह अंतर्गत सोमनाथपूर येथे तहसीलदार राम बोरगावकर यांनी गावातील लोकांना व लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या सूचनेनुसार महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, डीबीटी योजने अंतर्गत शासकीय अनुदानाच्या रकमेच्या लाभापासून शिल्लक असलेल्या लाभार्थी यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी घरोघरी जाऊन केवायसी करण्याकरिता नागरिकांच्या भेटी घेऊन केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले,यावेळी मंडळ अधिकारी अभिमन्यू म्हेत्रे,सरपंच अंबिका ज्ञानेश्वर पवार,उपसरपंच अमित माडे, ग्रामपंचायत सदस्या. शिवकरणाताई आंधारे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण राठोड यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments