किडनीच्या आजाराने परेशान असलेल्या कामगाराला स्वप्निल जाधव मित्र मंडळाकडून अर्थसहाय्य
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले युवानेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी मतदार संघात पुन्हा नव्या जोमाने जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर स्वप्निल अण्णा जाधव युवा मंच, स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळ अशा संघटनांची स्थापना करून गाव पातळीवर सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.
आपण अत्यंत गरिबीतून पुढे आलो, आपले वडील कष्टकरी कामगार होते. त्यामुळे कष्टकरी कामगार लोकांना आपण मदत केली पाहिजे, या भावनेने ते सतत कामगारांसाठी वेगवेगळे कार्यक्रमही घेत आहेत. उदगीर येथील भुजंग कोंडीबा मटके या कामगाराची एक किडनी खराब झाली असून दुसऱ्या किडनीलाही त्रास होत असल्याची माहिती समजताच, योग्य उपचारासाठी भुजंग कोंडीबा मटके यांना प्रत्यक्ष भेटून स्वप्नील अण्णा जाधव मित्र मंडळाच्या वतीने अर्थसाह्य करण्यात आले आहे. याप्रसंगी शेख जम्मू मुसा, ज्ञानोबा शिंदे, अंतेश्वर सूर्यवंशी, माधव शेळके, विश्वनाथ गायकवाड, शिवराज शिंदे, शेख मोहम्मद, उमाकांत शिंदे इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.
स्वप्निल अण्णा जाधव हे तसे फार गर्भ श्रीमंत आहेत असे नाही. मात्र त्यांच्या मनाची श्रीमंती फार मोठी आहे. त्यांच्यावर झालेले त्यांच्या वडिलांचे संस्कार फार मोठे आहेत. त्यामुळेच ते गोरगरिबांना खुल्या दिलाने अर्थसहाय्य करतात. मदतीचा हात पुढे करतात. हा त्यांचा मोठेपणा निश्चितच समाजातील इतर नेत्यांनी डोळ्यासमोर ठेवून गरजूंना अर्थसहाय्य करावे. असे आवाहन अखिल भारतीय सेना लातूर जिल्हा नेते विश्वनाथ गायकवाड यांनी केले आहे.
याप्रसंगी बोलताना स्वप्नील अण्णा जाधव म्हणाले की, मी करत असलेली ही मदत रुग्णाला पूर्ण बरे करू शकेल इतकी मोठी नाही. मात्र माझ्या क्षमतेने आणि माझ्या बुद्धीने जे पटले ते करावे. या उद्देशाने मी ही मदत देत आहे. समाजातील इतर सामाजिक जाणीव जपणाऱ्या लोकांनीही अशा गोरगरिबांना अर्थसहाय्य करावे. असेही आवाहन त्यांनी केले आहे.
0 Comments