जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही : माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर : आजचा विद्यार्थी उद्याचे आपल्या
देशाचे भविष्य आहे. शिक्षणाच्या बाबतीत आपण गंभीर होऊन विविध शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच भौतिक सुविधा मिळाल्या तरच ते शिक्षणाच्या बाबतीत पुढे जातील. आपले उदगीर म्हणजे गुणवंताची खाण आहे याचा मला सार्थ अभिमान असुन
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते मराठा सेवा संघ उदगीरच्या वतीने आयोजीत उदगीर व जळकोट येथील इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.
यावेळी विशेष सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभागाचे शिक्षक आ.विक्रम काळे हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विवेक सुकने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डाॅ.सुधीर जगताप, विठ्ठलराव जाधव, मादलापुरचे सरपंच उदयसिंह मुंडकर,
प्रकाश साखरे, आबा कदम, विनायक जाधव, बिपीन पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव, अनिता जगताप, पुष्पा जाधव, उमाकांत मटके, एस.टी. पाटील, किशनराव बिरादार, माधव हलगरे, राजकुमार कानवटे, भरत पुंड, भास्कर मोरे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर कष्टशिवाय पर्याय नाही. शिक्षणामुळेच घराची प्रगती होते.
माझ्या मतदार संघातील विद्यार्थी
मोठ्या पदावर गेले पाहिजेत म्हणून मागील वर्षी शिक्षण परिषद मतदार संघात घेतली. आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळा मोठ्या झाल्या पाहिजेत म्हणून मी मंत्री असताना दिल्लीला जावून शिक्षणाचा पॅटर्न पाहिला. पुढच्या पिढीला घडवायचे असेल तर
शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सुख सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी मी प्रयत्न करत आहे.
आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय, दृष्टीकोन, कृती या त्रिसुत्रीचा अवलंब करावा लागेल असा कानमंत्र आ.बनसोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
गेल्या अनेक वर्षापासुन मराठा सेवा संघाच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत याचे मला विशेष कौतुक वाटते.
आपल्या शहरात ९ कोटी रुपयाचे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारत असुन लवकरच त्याचे काम पूर्ण होईल.
मराठा समाजाच्या स्मशानभुमीसाठी २५ लक्ष रु दिले. छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशव्दारासाठी १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन घेतला तर मराठा समाजातील
मुला - मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात सारथीच्या माध्यमातुन वसतिगृह उभारत आहोत. लवकरच उदगीर येथेही वसतिगृह करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सांगुन भविष्यात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास ज्ञानेश्वर नकुरे, प्रा. संभाजी जाधव, गणपत गादगे, कालिदास बिरादार, अंगद पाटील, अंकुश हुंडेकर, आनंद कदम, डॉ. विजयकुमार मोरे, संदीप जाधव , कमलाकर मुळे, हनुमंत लोभाजी, रामेश्वर बिरादार, दीपक बिरादार, प्रा.अनंत पाटील, अनिता जगताप, शिल्पा इंगळे, स्वाती जाधव , मीरा मोरतळे, जयमाला काळे, बबीता पाटील नागनाथ काळे, प्रा. निवृत्ती तिरकमटे , एस. एस.जाधव, पिंटू बिरादार, राजकुमार अतनुरे,राजकुमार माने, आदी सह प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन
प्रदीप ढगे यांनी केले तर आभार राजकुमार कानवटे यांनी मानले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.
0 Comments