आमदार संजय बनसोडे यांनी मतदार संघाचा कायापालट केला.अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे,
उदगीर:शहरात दिवसेंदिवस मजुरांची संख्या वाढत असून शहरात बांधकाम मजूरांसाठी कामगार भावनांची इमारत उभी करावी अशी मागणी उदगीर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्याकडे बहुजन विकास अभियान संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट मतदार संघाचे आमदार झाल्यापासून शहरातील असलेल्या सर्व प्रशासकीय इमारती,लिंगायत भवन,मुस्लिम शादी खाना, छत्रपती सांस्कृतिक भवन,रेड्डी भवन, असे अनेक विकास कामे मंजूर करून उदगीर मतदार संघाचा कायापालट केला,त्याच धर्तीवर उदगीर शहरात कामगार भवन मंजूर करून इमारत उभी करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे. मानसिंग पवार, संजय राठोड, आकाश कस्तुरे, लक्ष्मण आडे, गोरख वाघमारे, नरसिंग नायडू, राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते
0 Comments