तळवेस येथे एकास मारहाण,मोबाईल व दोन हजार सातशे रुपये काढून घेतले,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील तळवेस येथे एकास मारहाण झाल्याची घटना 25 जून रोजी घडली,पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की.फिर्यादी खिजर सईद चाऊस यांना आरोपीने तुला बोलायचे आहे म्हणून स्कुटीवर बसवून तळवेसच्या बाजूला असलेल्या समाज मंदिरासमोर घेवून जाऊन फिर्यादीस शिवीगाळ करून मागील भांडणाचा राग मनात धरून लाथा बुक्याने फिर्यादीच्या मानेवर छातीवर मांडीवर डाव्या बरगडीवर मारहाण करून 12 हजार रुपयांचा मोबाईल व 2700 रुपये काढून घेतले.अशी फिर्याद खिजर सईद चाऊस यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी इरफान कुरेशी,उजेर कुरेशी,मोनू शेख, यांच्यावर गुरंन 196/23 कलम 327,294,323,504,34 भादवी प्रमाणे 27 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल सरफराज गोलंदाज हे करीत आहे.
0 Comments