संजय बनसोडे सारखा आमदार मिळणे हे उदगीरकरांचे भाग्य
उदगीर:मतदार संघाचा विकास माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या कार्यकाळातही झाला होता म्हणून आजही उदगीर मतदार संघात बाळासाहेब जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते,त्यानंतर माजी आमदार स्वर्गीय लोकनेते चंद्रशेखर भोसले यांनीही उदगीर मतदार संघात सर्वाधिक रस्ते असतील, शेतकऱ्यांसाठी विद्युत डीपी,तलाव,पाटबंधारे यासारखी भरपूर कामे केली,त्यानंतर उदगीर मतदार संघाचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी मात्र उदगीर व जळकोट मतदार संघात विकासाची गंगा आणून मतदार संघाचा कायापालट केला,संजय बनसोडे यांच्या रूपाने उदगीर मतदार संघाला आमदार मिळणे हे उदगीरकरांचे भाग्य आहे. आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने उदगीर शहरांची विकासाकडे घौडदौड वाटचाल सुरू असून उदगीर शहरातील रस्ते,तहसील कार्यालय इमारत, उपजिल्हाधिकारी कार्यालय इमारत, पंचायत समिती इमारत, सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत, शासकीय विश्राम गृह,मुस्लिम शादीखाना,कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत, लिंगायत भवन, शहर पोलीस ठाणे इमारत,बस्थानक इमारत बांधकाम,पोलीस वसाहतीचे बांधकाम,असे अनेक विकास कामे सध्या उदगीर मतदार संघात सुरु आहेत. हे सर्व कामे माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी मंजूर करून घेतले,शहरातील सर्व प्रशासकीय इमारतीचे काम सध्या प्रगतिपथावर सुरू असून,माजी मंत्री बाळासाहेब जाधव व माजी आमदार स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांच्या नंतर एवढया मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणून उदगीर मतदार संघाचा विकास करणारा आमदार म्हणून संजय बनसोडे यांचे नावं येणारी पिढी नक्कीच घेईल.आमदार संजय बनसोडे न थकणारा विकासासाठी रात्रंदिवस एक करणारा,गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणारा, प्रत्येकांच्या सुख दुःखात जाऊन धीर देणारा,उदगीरच्या इतिहासातील पहिलाच आमदार म्हणजे संजय बनसोडे उदगीर शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आमदार संजय बनसोडे यांच्या नावारूपानेच होत आहे,उदगीर तालुक्यातील विकास कामे पाहून आमदार संजय बनसोडे यांना अनेकवेळा विकास पुरुष आमदार म्हणून गौरविण्यात आले,उदगीर तालुक्याला आमदार म्हणून संजय बनसोडे लाभले हे उदगीरकरांचे भाग्य आहे.
0 Comments