मणिपूर घटनेची बहुजन विकास अभियानाने केला जाहीर निषेध.दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी
उदगीर:मणिपूर राज्यात मे महिन्यात महिलांची अतिशय निर्दयीपणे दिंड काढून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महिलेच्या वडिलांचाही खूण करण्यात आला.महिलेवर सामूहिक बलात्कार करताना महिलेच्या भावाने महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला असता महिलेच्या भावाचाही खून करण्यात आला.ही घटना भारतातील प्रत्येक नागरिकांचे मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने न्यायधीस चंद्रचूड यांनी सरकारला खडे बोल सुनावले सरकार म्हणून या घटनेच्या दोषींवर कारवाई करा अन्यथा आम्ही कारवाई करू असे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार व मणिपूर सरकारला चांगलेच फटकारले.या घटनेचा व्हिडीओ शोसल मीडियावर व्हायरल होताच भारतातील अनेकांनी तीव्र शब्दात निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही असे म्हंटले आहे.बलत्कार प्रकरणातील चार आरोपीना मणिपूर पोलिसांनी अटक केली आहे. मणिपूर घटनेचा उदगीर येथील बहुजन विकास अभियानाच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर मणिपूर राज्यात घडलेल्या बलात्कारांचा जाहीर निषेध करून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी असी मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने व मणिपूर सरकारने दोषीवर कडक कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यापासून मणिपूर राज्यात हिंसाचार पेटला आहे.मणिपूर राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हाताळावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे, संजय राठोड,अनिल भोसले, आकाश कस्तुरी, लक्ष्मण आडे, अमोल सूर्यवंशी, लखन कांबळे, मानसिंग पवार, शेख फैयाज, पठाण शेख, राम तांदळे, सुनील पाटील, राजकुमार कारभारी,नरसिंग गुरमे, राजकुमार गाथाडे, सुनील पाटील, रवी डोंगरे,बालाजी सूर्यवंशी, आदी उपस्थित होते
0 Comments