अतनूर येथील पाझर तलावाचा बांध फुटून ; दोन म्हैशी दगावली
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील पाझर तलाव क्रं १ हा गुरूवार दि.२० जुलैच्या अतिवृष्टीमुळे पाळु व सांडव्याच्या बांधकामसह बांध फुटला असून पाझर तलावाच्या सांडवा व पाळु खालील शेतकरी विश्वनाथ मारोती सोमुसे यांच्या २ गाभणी म्हैशी प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने जागेवरच मरण पावली. तसेच आसपासच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांसह शेतातील काळी माती खरडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
अतनूर परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच अखंड पाऊस सुरू असल्याने शेतीचे तलावात रूपांतर झाले असून पाऊस सुरूच आहे. या संततधार अतिवृष्टीमुळे गुरूवारी रात्रीला अतनूरच्या सोमुसे परिवारांच्या शेतीत असलेले पाझर तलाव क्रं १ चा.सांडवा बांधातील पाळू व काळी माती हळूहळू ढासळुन बांध व पाळु फुटल्याने शेतकरी विश्वनाथ मारोती सोमुसे या शेतकऱ्यांचे शेतात खुटयाला बांधलेल्या दोन गाभणी म्हैस अचानकच मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात मृत्यू पावले. या गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मयत दोन म्हैशीची अंदाजे १ लाख २० हजार किंमत आहे. तसेच यांची खरीपातील पिकांसह जमीनही खरडून गेली आहे. अतनूर येथील पाझर तलाव क्रमांक १ च्या बांधावरून (पाळूवरून) बांध फुटून पाणी वाहिले. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तलाव फुटून शेकडो एकर जमिनीचे नुकसान होणार आहे. पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रशासन उपाययोजना करावी व मयत २ म्हैस नुकसान शेतकरी विश्वनाथ मारोती सोमुसे यांना शासनाकरवी त्वरीत आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषेदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सरपंच चंद्रशेखर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, शिवसेनायुवासेनेचे जळकोट तालुकासंघटक मुक्तेश्वर येवरे-पाटील, भाजपाचे जळकोट तालुकाउपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, पत्रकार संजय शिंदे यांनी केली आहे. तसेच मरसांगवी ते अतनूर तेरू नदीवरील पुल पाण्याखाली आल्याने वाहतूक पुर्णपणे बंद होती.
0 Comments