कौळखेड रोडवर ऑटोसह देशी दारू पकडली 1 लाख 3 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त
उदगीर:कौळखेड जाणाऱ्या रोडवर उदगीर ग्रामीण पोलिसांनी ऑटोरिक्षासह देशी पकडून ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 6 ऑगस्ट रोजी कौळखेड रोडवर एक काळ्या रंगाचा बजाज कंपनीचा MH 24 AT 2398 या क्रमांकाचा ऑटोमध्ये विनापरवाना भिंगरी देशी दारूच्या 180 ml च्या 48 सीलबंद बाटल्या ज्याची किंमत 3 हजार 360 रुपये व जुना वापरात असलेला जुना ऑटो ज्याची किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 3360 रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला असी फिर्याद पोलीस नाईक संतोष माधवराव शिंदे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी विठ्ठल लक्ष्मण जाधव यांच्यावर गुरंन 469/23 कलम 65 अ इ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार 6 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने बिट जमादार हे करीत आहेत
0 Comments