कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी
लातूर:जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे. याची आजपर्यंत सरकारने कुठलीही दखल घेऊन पंचनामे केले नाहीत किंवा आर्थिक मदतही जाहीर केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी असी मागणी संभाजी ब्रिगेड लातूरच्या वतीने उदगीरच्या उपजिल्हाधिकाऱ्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी जितेंद्र मादलापूरकर जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड,लातूर, शिल्पाताई इंगळे जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी लातूर, बाबासाहेब एकुरकेकर जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड, चंचलाताई हुगे जिल्हा सचिव, महिला आघाडी लातूर, लक्ष्मीताई बिरादार ता. अध्यक्ष महिला आघाडी उदगीर, विमलताई मदने शहराध्यक्ष महिला आघाडी उदगीर, पूजा चव्हाण ता.संघटक महिला आघाडी, राजकुमार माने तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, उदगीर, देवा भाऊ घंटे विधानसभा अध्यक्ष उदगीर, बालाजी कसबे ता.उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड उदगीर,व्यंकट थोर,दत्ता मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments