उदगीरात गुटख्यासह 5 लाख 31 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी पकडला
उदगीर:शहरातील उषा पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेला उदगीर ग्रामीण पोलिसांनी 23 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला आहे, पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दत्ता ऊर्फ योगेश गोरे व योगेश संग्राम मिरजगावे दोघेही राहणार अहमदपूर या आरोपीनी महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटख्याची विनापरवाना चोरटी वाहतूक करीत असताना त्यांच्याकडून विमल पान मसाला गुटख्याची 600 पुडे ज्याची किंमत 72 हजार रुपये व रजनीगंधा 5376 पुड्या ज्याची किंमत 53760 रुपये व आरमडी 30 बॉक्स ज्याची किंमत 18 हजार रुपये एम सेंटेड तंबाखू 30 बॉक्स 18 हजार रुपये असा एकूण 1 लाख 61 हजार 760 रुपयांचा गुटखा व पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर एम एच 12 एन एक्स 2821 क्रमांकाची 3 लाख 70 हजार रुपयांची कार असा एकूण 5 लाख 31 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे अशी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सुमेध श्यामराव बनसोडे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून दोघा आरोपीविरुद्ध गुरंन 513/23 कलम 328,272,273,188 भादवी अन्न सुरक्षा कायद्यानुसार 23 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक देवकते हे करीत आहेत.
0 Comments