गोल्डी बार मारहाण प्रकरण आरोपींना अंतरीअटकपूर्व जामीन.
औरंगाबाद: उदगीर येथील गोल्डी बार मधील जबर मारहाण प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने दोन आरोपींना अंतरिम अटकपूर्व जमीन दिला आहे. सदर प्रकरणी थोडक्यात हकीकत अशी की उदगीर येथील बिदर रोड वरील वरील गोल्डी बार येथे बारमालकास कत्ती, चाकू ने मारहाण केल्या संबंधात मालकाने एकूण अकरा आरोपी विरोधात पोलीस स्टेशन उदगीर येथे लेखी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या नाराजीने आरोपींनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्वपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता माननीय सत्र न्यायालयाने सदर अर्ज फेटाळून लावला तदनंतर आरोपींनी माननीय माननीय उच्च न्यायालयात अडवोकेट अजिंक्य रेड्डी यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला असता, अर्जदारांतर्फे फिर्यादीमध्ये सदर आरोपींनी विरोधात कोणत्याही प्रकारचे आरोप केले गेले नाहीत तसेच संपूर्ण फिर्यादीचे अवलोकनाअंती आरोपींविरोधात सकृत दर्शनी कोणताही गंभीर गुन्हा केल्याचा आरोप दिसून येत नाही असा युक्तिवाद अन्य उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आला मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय आर. एम. जोशी साहेब यानी प्राथमिक सुनावनि अंती आरोपींना अंतरिमटक पूर्व जामीन देऊन दिला दिलासा दिला सदर प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट अजिंक्य रेड्डी यांनी काम पहिले.
0 Comments