तालुकास्तरीय शालेय क्रीडा क्रिकेट स्पर्धेत विद्या वर्धिनी हायस्कूल तालुक्यात प्रथम
येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल उदगीर या शाळेतील 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा क्रिकेटचा संघ तालुक्यात प्रथम स्थान मिळून शाळेचे, आई-वडिलांचे, उदगीर तालुक्याचे नावलौकिक केले आहे.या विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून जिल्हास्तरावर संपन्न होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी - निखिल मडके, स्वरूप पटके,हर्षद शिंदे, कृष्णा कोयले, सम्राट गायकवाड, शुभम धनबा, सिद्धांत कांबळे, पियुष राठोड, ओमकार कांबळे, ईश्वर सूर्यवंशी,आदित्य नुते,व्यंकटेश जाधव, प्रतीक गायकवाड, मुस्तफा सय्यद,रोनक कांबळे, अमित बिरादार या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एम बांगे,उपमुख्याध्यापक बी.बी नागरवाड,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हनमंते, मार्गदर्शक आर.बी वाघ, कलाशिक्षक एन.आर जवळे, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील,बंडू पाटील,व्ही.एस कणसे,आर.एस नगरे,के.एम राजुरकर,सी.व्ही पाटील,एम.एस जाधव,अंगद राठोड,शेख महबूब, गफूर कोतवाल यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments