माझी माती,माझा देश' अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील अमृत कलश मुंबईकडे रवाना
लातूर,:‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातून ग्रामपंचायत ते नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रातून एकत्र केलेले मातीचे अमृत कलश आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या उपस्थितीत मुंबईकडे रवाना करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त रामदास कोकरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी,नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक साक्षी समैया उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रत्येक पंचायत समितीमधून एक असे 10, जिल्ह्यातील 9 नगरपालिका व नगरपरिषदेतून एक आणि महानगरपालिकेचा एक अमृत कलश असे एकूण 12 अमृत कलश आज जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथून बसने लातूर रेल्वेस्टेशनकडे आणि तेथून रेल्वेने मुंबई येथे रवाना होतील. मुंबई येथून 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीकडे रवाना होतील. दिल्ली येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 31 ऑक्टोबर रोजी भव्य कार्यक्रम होणार आहे. देशभरातून दिल्ली येथे पोहचलेल्या अमृत कलशातून
अमृत वाटिका तयार केली जाणार आहे.
0 Comments