तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे हैद्राबाद मुक्ती लढ्यात मोठे योगदान - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
यांच्या पुतळ्याला पाहिल्यावर परिसरातील तरुण पिढीला ऊर्जा मिळेल
पुढच्या पिढीने स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची यशोगाथा कायम स्मरणात ठेवावी
जळकोट/ उदगीर : हैद्राबाद मुक्ती लढ्यात तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान असून, त्याचे कार्य अजराअमर आहे . स्वातंत्र्य सेनानी कै.शिवाजीराव राठोड हे धाडसी व्यक्तीमत्व होते म्हणून त्यांच्या नावावरूनच या परिसराचे नाव हे शिवाजीनगर तांडा म्हणून ओळखले जाते. आज आपण इंटरनेटवर सर्च केले तरी आपल्याला शिवाजीनगर तांडा दिसून येते अशी किर्ती त्यांच्या नावाची आहे. या भागाचा ठाण्या वाघ म्हणून त्यांना ओळखले जायचे. १९९९ पासून माझे व राठोड कुटूंबियांचे संबंध आहेत. आपले आई - वडील हेच आपले दैवत व देव असतात म्हणून आपण सर्वांनी आई - वडिलांची सेवा केली पाहिजे. या पुतळ्याला पाहिल्यावर परिसरातील तरुण पिढीला ऊर्जा मिळेल. आपल्या तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे हैद्राबाद मुक्ती लढ्यात मोठे योगदान असुन त्यांच्या शौर्याच्या गाथा ह्या अजराअमर असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते शिवाजीनगर तांडा ता.जळकोट येथील स्वातंत्र्य सैनिक कै.शिवाजीराव राठोड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.गोविंदराव केंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपुरचे माजी सभापती शिवानंद हेंगणे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, जळकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, माजी जि.प. सदस्य चंदन पाटील नागरगोजे, माजी जि.प. सदस्य रामराव राठोड, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा.श्याम डावळे,वसंत पाटील, माजी सभापती कांताबाई नागरगोजे पाटील, संग्राम हासुळे पाटील , खादर लाटवाले, व्यंकटराव गवळे, राजु मोटेवाड, संगम टाले, अतनुरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, देऊळवाडीचे सरपंच शुभम केंद्रे, व्यंकटराव पाटील, खाजा तांबोळी, माजी सरपंच मंगेश हुंडेकर, बळीराम केंद्रे, बालाजी बारमाळे, दिलीप कोंपले, वामनराव राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, तिरुका व घोणसी येथील स्वातंत्र्य सैनिकांनी
आपल्या प्राणाची आहुती देऊन निजाम राजवटीतून हैद्राबाद मुक्त करणासाठी झुंज दिली होती. स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकाराशी कशी कडवी झुंज दिली होती हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला माहिती पाहिजे म्हणुन अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या धाडसाचे प्रसंग आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितले पाहिजे आणि त्यांच्या बलिदानाच्या यशोगाथा आपण कायम स्मरण केल्या पाहिजेत. त्यापैकीच एक
स्वातंत्र्य सेनानी कै.शिवाजीराव राठोड हे होते.
समाजासाठी तळमळणारा नेता म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. बंजारा समाजाला शिक्षणापासुन वंचित असलेल्या घटकाला शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून देवुन बंजारा समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याने या भागातील बंजारा समाजाचा विकास झाला असल्याचे मत ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव राठोड यांनी केले. सुत्रसंचलन रमेश होनशेट्टे यांनी केले तर आभार प्रा.श्याम डावळे यांनी मानले. या कार्यक्रमास राठोड कुटुंबीय व राठोड कुटुंबीयावर प्रेम करणारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments