पंचायत समितीच्या माजी सदस्या सारजाबाई नारायण पाटील यांचे दुःखद निधन.बंजारा समाजाची न भरून निघणारी पोकळी निर्माण
उदगीर:तालुक्यातील सोमनाथपुर येथील पंचायत समितीच्या माजी सदस्या सारजाबाई नारायण पाटील यांनी 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता सोमनाथपुर येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सारजाबाई नारायण पाटील मागील बरेच दिवसापासून आजारी होत्या.त्यांनी 2016 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून तोंडार पंचायत समितीची निवडणूक लढवली होती,या निवडणुकीत त्या दणदणीत विजयी झाल्या होत्या.सारजाबाई यांच्या पश्चात सहा मुले व सात मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.नारायण पाटील या घराण्याची बंजारा समाजात मोठी ओळख होती.त्यांच्या निधनामुळे तालुक्यातील बंजारा समाजाची भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती देवो हीच ईश्वरचरणी विक्रांत परिवाराकडून प्रार्थना.
0 Comments