Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देवणी येथील ग्रामविकास अधिकारी एच. एम. केंद्रे यांना कृषी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती

देवणी येथील ग्रामविकास अधिकारी एच. एम. केंद्रे यांना कृषी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती

देवणी : देवणी पंचायत समितीला कार्यरतअसलेले ग्रामविकास अधिकारी  एच. एम केंद्रे यांना नुकतेच कृषी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली असून  त्यांना अहमदपूर येथील पंचायत समितीला नियुक्ती देण्यात आली आहे 
सविस्तर माहिती अशी की
एच. एम केंद्रे यांनी गेली तीस बत्तीस वर्ष अनेक ग्रामीण भागात केलेली कामे आपली ओळख निर्माण करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे यांच्या कार्याची दखल घेऊन प्रशासनाने पदोन्नती देण्यात आली आहे त्यामुळे एच. एम. केंद्रे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे
 एच. एम .केंद्रे यांनी ज्या ज्या तालुक्यातील गावात नोकरी केली त्या त्या गावात विकास
कामाच्या माध्यमातून आपली छाप मागे सोडली आहे तीस बत्तीस वर्षाच्या कार्यकाळात साधी एकही तक्रार सुद्धा नाही त्यांचे कार्य  आकाशाला गवसणी घालणारे आहे
  गावातील विकास कामाची आखणी करून संबंधित कामाचा आराखडा तयार करून तो आराखडा प्रशासनाकडून मंजूर करून घेऊन त्या कामाची अंमलबजावणी करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे ग्राम पंचायतीचे सचिव म्हणून काम करणे ग्रामविकास अधिकारी यांचे काम आहे  देवणी तालुक्यात सध्या कार्यरतअसलेले एच एम केंद्रे गेली तीस बत्तीस वर्ष आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत नुकतेच त्यांनी केलेल्या कार्याबद्दल उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले अशा प्रकारचे नेत्रदीपक कार्य
करणाऱ्या कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी ते कृषी विस्तार अधिकारी यांची खास मुलाखत.....!
     एच. एम. केंद्रे हे आपले शिक्षण पूर्ण करून आईवडील याना थोडाफार हातभार लावावा म्हणून नोकरीच्या शोधात असतांना एच.एम. केंद्रे हे दि 8/5/1990 येथे ग्रामसेवक म्हणून अहमदपूर तालुक्यात रुजू झाले त्यांनी या तालुक्यात खलगरी रायवाडी,येथे काम केले नंतर निलंगा तालुक्यात बदली झाली या तालुक्यातील तगरखेडा,पानचिंचोली अशा मोठं मोठ्या गावात आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक विकास कामे केली यांची दखल घेऊन 1996 ला उदगीर येथे बदली उदगीर इथे झाली उदगीर तालुक्यातील  मोघा, बामणी,  निडेबन,  इथे 9 वर्ष  बामणी,10 वर्ष  नेत्रगाव,7वर्ष  शिरोळ जानापूर 4 वर्ष  आपली सेवा बजावली व त्यांचे 2003  ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती झाली व 2003 ते 2012 पर्यंत नऊ वर्षे निडेबन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहीले जून 2012  मध्ये देवणी इथे बदली झाली त्यांनी देवणी तालुका असलेल्या देवणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केले सध्या ते  दवनहिप्परगा भोपणी वलांडी  इथे कार्यरत आहेत यांच्या कार्यकाळात  संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, कुटुंब नियोजन,पुनर्वभरन, 55 हातपंप,पुनर्भरण करून गावासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात हनुमंत केंद्रे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे तीस बत्तीस वर्षाच्या काळात अहमदपूर, उदगीर, निलंगा सारख्या तालुक्यात काम करून अनेक गावातील अनेक समस्याला सक्षमपणे तोंड देत प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याचे काम एच. एम. केंद्रे यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमतेने केले आहे यांच्या कार्यकाळात ज्या ज्या गावी नोकरी केली त्या गावाला प्रशासनाच्या वतीने दिले जाणारे सर्वच पुरस्कार त्यांनी मिळवून दिले आहे केंद्रे हे अगदी मितभाषी मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या जवळ आलेला एकही माणूस दूर जात नाहीत आत्ता सेवनिवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांनी आयुष्यभर सेवेत असणाऱ्या कर्मचारी याना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी कर्मचारी संघटनेचे अनेक पदे त्यांनी उपभोगले आहेत कुठल्याही कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्नरत राहिले आहेत आज ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष व सल्लागार म्हणून कार्यरत आहेत त्यानी प्रशासनात राहून केलेल्या कार्याचा आलेख अनेक ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना प्रेरणादायी आहे ग्रामसेवक ते ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यकाळात हनुमंत केंद्रे यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील एवढे माणसे मिळविले आहेत ही यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कामाई म्हणावी लागेल  नोकरी म्हणटले की कळत न कळत प्रत्येक अधिकारी यांच्या हातून समाजसेवा घडत असते त्यांच्या कार्यकाळ अनेक लोकांना रमाई अवास योजना व प्रधानमंत्री अवास योजने मार्फत घरकुल देऊन अनेकांच्या घरकुलाचे स्वप्ने साकार केली आहेत अनेक गावांत लाईट रस्ते पाणी या कामांना प्रमाण मानून हे कामे प्राधान्याने सोडविले आहेत ग्राम पंचायत मार्फत शिक्षणासाठी खर्च करण्यात येणारा शालेय निधी शाळेसाठी खर्च करून प्रत्येक गावात शैक्षणिक हातभर लावला आहे अशा कर्तव्येदक्ष कार्यासाम्राट ग्रामविकास अधिकारी यांच्या पुढे सर्वच पुरस्कार फिके पडतात  यांचे नेत्रदीपक कार्याची दखल घेऊन प्रशासनाने त्यांना कृषी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे त्यांच्या पाठीशी सर्व सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे व त्यांच्या कार्याचे फलित म्हणूम ही पदोन्नती मिळाली आहे. 

Post a Comment

0 Comments

जाहिरात