ब्राईट स्टार इंग्लिश हायस्कूल येथे दांडिया उत्सव साजरा
उदगीर:येथील ब्राईट स्टार इंग्लिश हायस्कूल येथे नवरात्री निमित्ताने 21 अक्टोबर रोजी कुमारीपूजन व महिलांसाठी दांडिया उत्सव आयोजीत करण्यात आला होता, महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात.यावेळी प्रा.विरभद्र शं घाळे
अध्यक्ष,विश्वशांती शिक्षण संस्था
उदगीर.प्रा सौ प्रेमा वि घाळे
सचीव,विश्वशांती शिक्षण संस्था,सचीव डाॅ भाग्यश्री घाळे यांनी शक्तीस्वरूप कुमारिकांचे पुजन केले.यावेळी मा.पं.स.उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,प्रा श्याम डावळे,प्रा सर्जेराव भांगे, शाळेचे शिक्षक व परिसरातील हजारहून अधिक महिला भगिनी उत्साहाने सामील होत्या. गत 13 वर्षांपासून ब्राईटस्टार हायस्कूल मध्ये होणाऱ्या कुमारी पुजन व दांडिया महोत्सवाचे साहेबांनी कौतुक केले व फक्त शैक्षणीक क्षेत्रच नाही तर ब्राईट स्टार पॅटर्न सांस्कृतीक क्षेत्रात ही सर्वात पुढे असल्याचे आनंद व्यक्त केले.शाळेतील चिमुकल्यांसह साहेबांनी दांडिया खेळताना उत्कृष्ट असा आनंदसोहळा सर्वांना अनुभवता आला.
0 Comments