Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सांगायो योजनेचे 4,48,42,400 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा,तहसीलदार रामेश्वर गोरे यांची माहिती

सांगायो योजनेचे 4,48,42,400 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा,तहसीलदार रामेश्वर गोरे यांची माहिती

*लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड*
उदगीर तालुक्यातील सांगायो योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या अनुदानामुळे लाभार्थ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे,निराधार आर्थिक दुर्लब व्यक्तींसाठी शासनाने अर्थसहाय्य योजना सुरू केली,त्या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ योजना विधवा, अपंग योजना वृद्धपकाळ योजना आदी योजनेमधून निराधार अपंग,वृद्ध व निराश्रीताना आधार देण्याचे काम केले जात आहे,उदगीर तालुक्यात राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजनांतर्गत लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान रूपाने अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जाते, उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या निर्देशानुसार श्रावणबाळ निवृत्ती योजनेचे सर्वसाधारण लाभार्थी 4080 या लाभार्थ्यांच्या खात्यात 1,36,82,800 रुपये,श्रावणबाळ निवृत्ती योजना अ,जाती लाभार्थी 3958 या लाभार्थ्यांच्या खात्यात 1,61,73,800 रुपये, संजय गांधी निराधार योजनेचे सर्वसाधारण लाभार्थी 2235 या लाभार्थ्यांच्या खात्यात 100,39,300 रुपये खात्यात,संजय गांधी निराधार योजना अ जाती लाभार्थी 1107 या लाभार्थ्यांच्या खात्यात 49,46,500 रुपये खात्यात जमा करण्यात आले एकूण 12140 लाभार्थ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला,दिवाळी हा आनंदाचा सण आहे त्यामुळे निराधारानाही दिवाळी आनंदात साजरी करता यावी म्हणून माहे जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 पर्यंतचे एकूण 4,48,42,400 रुपये योजना निहाय विविध बँकेत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे,नायब तहसीलदार,संतोष धाराशिवकर,अव्वल कारकून तिडके मॅडम,अव्वल कारकून डी,आर फुटाणे,समाधान कांबळे(आयटी असिस्टंट) प्रेमला मुंगनाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात