अतनूर येथे मराठा आरक्षणासाठी मुक्तेश्वर पाटील यांचे बेमुदत आमरण उपोषण
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील शिवसेना-युवासेनेचे जळकोट तालुकाअध्यक्ष मुक्तेश्वर गोविंदराव येवरे-पाटील अतनूरकर व सकल मराठा समाजाच्या वतीने दि.३१ आँक्टोबर मंगळवार रोजी गावातून आरक्षणाच्या घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बेमुदत आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठीबा देण्यासाठी अतनूर येथील मुक्तेश्वर गोविंदराव येवरे-पाटील व सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जळकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या साखळी उपोषणाला सर्वधर्मीय समाज बांधवांनी उपोषणात सहभाग नोंदवून पाठींबा दिला. आरक्षण मिळेपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असून यानंतर मरन्नोत्तर बलिदानाची तयारी असल्याचेही मुक्तेश्वर पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हासरचिटणीस तथा तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष विकास गोविंदराव सोमुसे-पाटील, सरपंच चंद्रशेखर पाटील, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ऊर्फ पप्पू पाटील, दिलीप पाटील, साहेबराव पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, माजी उपसरपंच बालाजी पाटील, माजी सरपंच रमेश बोडेवार, ग्रा.प.सदस्या सौ.लीना विजय गव्हाणे-पाटील, सौ.दैवशाला साहेबराव गव्हाणे-पाटील, सौ.पुजा सुनिल कोकणे, सौ.संजीवनी गायकवाड, सौ.आरती प्रमोद संगेवार, प्रभूराव गायकवाड, विठ्ठल बारसुळे, अखिल भारतीय मराठा युनियन आँफ इंडियाचे बी.जी.शिंदे, राजेंद्र बंडरे, विनोद सोमुसे, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानोबा सोमुसे, मारोती येवरे, अनिल जाधव, असंघटित कामगार काँग्रेसचे कैलास सोमुसे-पाटील, गणेश गायकवाड, प्रकाशगुरूजी सोमुसे, साई ग्रुपचे सर्व पदधिकारी, महाराष्ट्र युवक कुणबी मराठा मंडळाचे प्रदेशअध्यक्ष एस.जी.शिंदे-पाटील, संजय कुलकर्णी, शिवतेज मुक्तेश्वर पाटील, कुंभार समाजाचे जिल्हाउपाध्यक्ष गोविंद बारसुळे, महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलच्या संस्थापिका प्राचार्य सौ.संगिता दिपक नेत्रगावे-पाटील, चंचल भारती चॕरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.चंचला शिवाजीराव हुगे यांच्यासह, लहान-मुलाबाळासह,लहान-मोठ्ठे महिला-पुरूष, विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती, वयोवृध्द महिला-पुरूष, सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्था, पदाधिकारी, कार्यकतीॅ, कार्यकर्ते, समाजसेवक, दिन-दलित, पददलित पदाधिकारी, दलितमित्र, वृक्षमित्र, समाजसेवकांनी सहभाग नोंदवला.
0 Comments