मोरतळवाडी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी आमरण उपोषण सुरू
उदगीर तालुक्यातील मोरतळवाडी येथे मनसे शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी 26 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलंय उपोषणाला पाच दिवस उलटून गेले असून प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही असे उपोषण कर्ते रामदास पाटील यांनी 1 नोव्हेंबर रोजी माध्यमासमोर बोलताना दिली,जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचेही बोलताना सांगितले, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज द्यावी,मराठवाडा दुष्काळ जाहीर करावा,पीकविमा त्वरित देण्यात यावा, राज्यातील सर्व साखर कारखान्याना एफआरटी प्रमाणे एक रकमी भाव देण्यात यावा, कारखानादारांच्या काट्यावर शेतकऱ्यांचा भरोसा नाही तरी बाहेरून काटा करून शेतकऱ्यांची गाडी आत मध्ये घेण्यात यावी,मराठयांना कुणबी आरक्षण देण्यात यावे,शासनाने सोयाबीन आठ हजार रुपये प्रमाणे खरेदी करावी,कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा,तेलंगणा राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मशागतीसाठी दहा हजार रुपये अनुदान द्यावे,कर्जमाफीचे 50 हजार रुपये त्वरित प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी मोरतळवाडी गावातच आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाला गावातील शाळकरी मुले व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय
0 Comments