उदगीर येथील महावितरण विभागीय कार्यालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी २ कोटी रुपयाचा निधी मंजूर
उदगीरकरांना ना.बनसोडे यांची दिवाळी भेट
उदगीर : तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी महावितरणचे विभागीय कार्यालय यापुर्वी भाडे तत्वावर व जुन्या क्वार्टरमध्ये होते. या कार्यकारी अभियंता कार्यालयाची नविन इमारत व्हावी व ग्राहक आणि नागरिकांच्या अडचणी तात्काळ दुर व्हाव्यात म्हणून या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे सतत पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नानेच आज उदगीर येथील महावितरण विभागीय कार्यालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी २ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्रातील एकमेव असे विभागीय कार्यालय हे केवळ उदगीर शहरात होत असून आता या नुतन वास्तुमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवल्या जावून त्यांच्या जीवनात ख-या अर्थाने प्रकाश देण्याचे काम ना.संजय बनसोडे यांनी केले आहे. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी व ग्राहकांनी ना.संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. महावितरणची एवढी मोठी इमारत तालुक्यात पहिल्यादांच होणार असुन या नविन इमारत बांधकामासाठी तब्बल २ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती ना.संजय बनसोडे यांनी दिली आहे.
0 Comments