उदगीर:तालुक्यातील पिंपरी येथील एक महिला घरातून निघून गेल्याची घटना 31 ऑक्टोबर रोजी घडली,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मीरा अरविंद सोनकांबळे वय 33 वर्ष राहणार पिंपरी ता उदगीर ही महिला बचत गटाचे पैसे उदगीरला भरून येते म्हणून घरातून निघून गेली आहे तीचा इकडेतिकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला असता आजपर्यंत मिळून अली नाही.महिलेचे वर्णन उंची पाच फूट, रंग सावळा,बांधा मजबूत,नाक सरळ,अंगात लाल कलरची साडी,पायात चॉकलेटी रंगाची सॅंडल, उजव्या हातावर एम असे गोंदलेले आहे अशी तक्रार अरविंद तुकाराम सोनकांबळे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून मिसिंग नंबर 47/23 प्रमाणे 2 नोव्हेंबर रोजी नोंद करण्यात अली आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल धुळेशेटे हे करीत आहेत.
0 Comments