गोपाळ जोशी यांचा कॅबिनेट मंत्री बनसोडे यांच्या हस्ते गौरव
उदगीर:येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथील माजी विद्यार्थी प्रिय, शिस्तप्रिय,संगीत कला शिक्षक तथा श्री जयदीप सेवाभावी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व अंबाजोगाई येथील ख्यातनाम गायक सूरमणी पंडित शिवदासजी देगलूरकर यांचे शिष्य गोपाळराव नरसिंगराव जोशी यांची त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे उत्कृष्ट केंद्र व्यवस्थापक,परीक्षक म्हणून इ. अनेक उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई द्वारा दिला जाणारा पंडित विष्णू दिगंबर पलूसकर संगीत कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन ज्येष्ठ नागरिक संघ उदगीर आयोजित विशेषांक प्रकाशन सोहळा प्रसंगी या कार्यक्रमात गोपाळराव जोशी यांना विशेष सत्कारमूर्ती म्हणून निमंत्रित करून त्यांचा उदगीर - जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रदेशाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गोविंद केंद्रे,डॉ. रामप्रसाद लखोटिया,रमेश अंबरखाने,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खंडेराव कुलकर्णी, प्रदीप बेंद्रे इत्यादी मान्यवर यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments