करखेली येथे शेतकऱ्यांच्या बोअरवेलच्या केबल वायरची चोरी,अज्ञातावर गुन्हा दाखल
उदगीर:तालुक्यातील करखेली येथे शेतकऱ्यांच्या बोअरवेलच्या केबल वायरची चोरी झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की करखेली येथील शेतकरी दिनेशबाबू राम शिंदे यांच्या शेतात असलेल्या बोअरचे केबल अंदाजे 105 मीटर ज्याची किंमत 9660 रुपये,स्टार्टर ज्याची किंमत 4 हजार रुपये, तसेच सर्विस वायर 38 की,ग्रा ज्याची किंमत 5700 रुपये असा एकूण 19360 रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने 17 नोव्हेंबर चोरून नेल्याचे निदर्शनास आले असी फिर्याद दिनेशबाबू राम शिंदे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरंन 645/23 कलम 379 भादवी प्रमाणे 18 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस नाईक केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
0 Comments