बहुजन विकास अभियानाच्या वतीने बाबासाहेब कांबळे यांचा सत्कार
उदगीर:बहुजन विकास अभियानाच्या वतीने संघर्ष नगर सोमनाथपुर येथे बाबासाहेब कांबळे लोणीकर यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पहार घालून जाहीर सत्कार करण्यात आला. लोणी येथील रहिवासी असलेले बाबासाहेब कांबळे हे महावितरण मध्ये शाखा अभियंता म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांना कार्यकारी अभियंता पदी पदोन्नतीची जबाबदारी मिळाल्याने त्यांचा बहुजन विकास अभियानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे, संजय राठोड माजी ग्रामपंचायत सदस्य,सुभाष राठोड, लक्ष्मण आडे,रवी डोंगरे,सोनाबाई डोंगरे,महिला आघाडीच्या ज्योती एकुरकेकर,शैलेश डोंगरे, कृष्णा गाडेकर,नरसिंग कांबळे,लोणीकर संजय,कांबळे प्रतिभाताई,अमित कांबळे,लक्ष्मण मुंडकर,सुनील पाटील,आदी उपस्थित होते.
0 Comments