सोमनाथपुर वार्ड क्रं. 01 मधील पाणी टंचाई व रस्त्याच्या दुरावस्थेवर त्वरीत कार्यवाही करा. मनसे
उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर वार्ड क.1 मध्ये ग्रामपंचायतचे बोर आहे त्या ठिकाणांवरून गावाला पाणी पुरवठा पाईपलाईन ने केलेला आहे परंतु सन 2023 मध्ये पाणीटंचाईचा पर्यायी व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयाने केला नाही म्हणून गावातील महिला व बालकांना व जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तरी प्रशासनाने सोमनाथपूर येथील वार्ड क्र. 1 मध्ये पाणीप्रश्नी कायमस्वरूपी व्यवस्था करून गावातील जनतेस होत असलेली पाणीटंचाईची समस्या दूर करावी व अंबिका कॉलनी मध्ये मुख्य रस्ता जो खोदून ठेवलेला आहे तो पाईपलाईन साठी ही योजना चालू होण्यास किमान 365 दिवसा पेक्षा ही जास्त दिवस लागणार आहेत .म्हणून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आपल्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व समस्त गावकरी घागर मोर्चा काढण्यात येईल. याची नोंद घ्यावी. आशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर याना देण्यात आले. हे निवेदन जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सोमनाथपुर विभागाचे तालुका उपाध्यक्ष दयानंद डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी उदगीर शहराध्यक्ष संतोष भोपळे विद्यार्थी सेना शहर सचिव रोहित सोमनाथपूर शाखाध्यक्ष बजरंग गोंदे,नामदेव राठोड, सुनील देवनाळे, केशव वाघमारे , राम डोंगरे, प्रदीप कुमार गायकवाड, उत्तम तलवारे, अश्विन बामणे, नागपूर्णे हनुमान सूर्यवंशी अनिकेत,सुग्रीव कांबळे धीरज माणसे, अजय सूर्यवंशी, शिवाजी सूर्यकांत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments