*मृदा संवर्धनाचा संदेश देत उदगीरहून 28 सायकलस्वार म्हैसूर पोहचले 900 कि.मी. पूर्ण*
उदगीर:सायकलिंग क्लबच्या 28 उत्साही सायकलस्वांरानी *मृदा संवर्धनाचा* संदेश घेऊन उदगीरहून त्रिवेंद्रम-केरळ 3 राज्यांतून (महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ) जाणारा हा 1600 किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत.
या सायकल प्रवासाची सुरुवात उदगीर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात झाली. प्रवास करताना प्रत्येक शहरात रँलीच्या माध्यमातून उदगीर ते कलबुर्गी, रायचूर, बेल्लारी, हरिऊर, नागमंगलम, मैसूर, असा 900 किलोमीटर अंतराचा प्रवास 6 दिवसात पूर्ण केले.
सायकल टीम कॉन्शियस प्लॅनेट Save Soil (माती वाचवा) उपक्रमासाठी काम करत आहे, जो ईशा फाऊंडेशनचा एक आउटरीच प्रकल्प आहे आणि मृदा संवर्धन आणि पुनरुज्जीवन याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करत आहे. ईशा फाउंडेशन च्या उपक्रमात सहभागी व्हायचे हे त्यांचे सलग सातवे वर्ष आहे. सायकलींग चा एक वेगळा मापदंड निर्माण करणाऱ्या आणि उदगीरकरांची शान असणाऱ्या या टीम मध्ये साईनाथ कोरे, सुनील ममदापूरे, अनिरुद्ध जोशी-हुमनाबादकर, अतुल वाघमारे, गोविंद रंगवाळ, बालाजी इंद्राळे, भीमाशंकर भैरेवार, नागनाथ वारद, दीपक पाटील, ज्ञानेश्वर चंडेगावे, कपिल वट्टमवार, श्याम सुगंधी, साईकांत मानकरे, भास्कर कुंडगीर, मुकिंद चव्हाण,महेश आलमकेरे, शैलेष सिध्दमवार, रामेश्वर तोंडारे, रितेश पंमपिटवार, सतीशकुमार चवळे, रितेश तिवारी, अनुज देशमाने, कैलाश वडजे, सुशील लोहकरे, चंद्रकांत ममदापुरे, विनोद टवाणी, बबन हैबतपुरे, मुकेश निरुणे तसेच सहकारी म्हणून गणेश गुंडरे, माधव हलकुडे, श्रीकांत इंद्राळे, राजकुमार वडगावे हे सहभागी आहेत.
समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments