उदगीर तालुक्यातील 1 हजार 246 सांगायोचे अर्ज मंजूर,तहसीलदार रामेश्वर गोरे
उदगीर:तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे 1 हजार 246 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उदगीर मतदार संघाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर,व उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे,यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात 6 डिसेंबर रोजी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना,अपंग,विधवा,पीडित आजार,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेचे 1 हजार 246 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,या बैठकीत नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर,अव्वल कारकून यु पी तिडके,डी आर फुटाणे,आय टी असीस्टंट समाधान कांबळे,प्रेमला गुगनाळे यांच्यासह नगरपालिका व पंचायत समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments