Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

दुचाकी व क्रुझरची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार...

दुचाकी व क्रुझरची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार...

उदगीर - बिदर रोडवरील शेल्हाळ पाटीजवळील घटना..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर - बिदर राज्य मार्गावरील शेल्हाळ पाटीजवळ दुचाकी व क्रुझर जीपची समोरासमोर धडक होऊन या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (७ डिसेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
उदगीर ते मोघा निघालेले दुचाकी क्र. एम.एच.२४ बी.टी.०५१ व समोरून उदगीरकडे जाणारी क्रुझर जीप क्र. एम.एच.२४ ए डब्ल्यू ८०२३ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक लागली. या अपघातात दुचाकीवरील तरुण संदीप मच्छीद्र सांवत (वय २३ वर्ष रा. मोघा  ता. उदगीर) याचा जागीच मृत्यू झाला. क्रुझर चालकाने अपघात होताच क्रुझरसह फरार झाला होता. घटनास्थळी सदरील क्रुझरचे पडलेले नंबर प्लेट पोलीसांच्या हाती लागले असून सदरील क्रुझर वागदरी (ता.देवणी) येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
क्रुझर जीप चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हायगयीने व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवुन फियादीचे मुलाचे दुचाकीला जोराची धडक देवुन त्याचे मरणास कारणीभूत झाला व पळुन जीपसह चालक पळून गेला. असा जबाब मयत तरुणाचे वडील मच्छीद्र पुडलीक सांवत रा. मोघा यांनी दिल्यावरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७३/२०२३ कलम २७९, ३०४(A) भा.द.वि. सह कलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार क्रुझर चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल पडीले हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments

जाहिरात