उदगीर तालुक्यातील प्रहार पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
उदगीर:प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्य मंत्री तथा विधमान आमदार,व अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य ओमप्रकाश बाबारावं कडू ( बच्चू भाऊ कडू ) त्यांच्या जनसेवा कार्यास प्रेरित होऊन जनसेवे साठी उदगीर तालुक्यातील अनेक युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.त्याच बरोबर उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर येथील संपर्क कार्यालयात तालुका प्रमुख रविकिरण बेळकुंदे,शहर प्रमुख महादेव मोतीपवळे,यांच्या उपस्थितीत तालुका ग्रामीण उपप्रमुख संदीप पवार,याच्या सहकार्याने मोहंमद भाई चौधरी यांची प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.यावेळी प्रहार सेवक सरकार महादेव आपटे,संघटक सोपान राजे,सरचिटणीस सुदर्शन सूर्यवंशी, चिटणीस बळीराम चौधरी,सुलतान कादरी, मुस्सा कादरी,पापें चौधरी,सोहेल कादरी,पठाण साब,फायाज शेख,खालिद चौधरी, शेख शहेबाज, मणियार खलील, शेख इकराम, शेख सुहेल, मजीद पटेल आदी उपस्थित होते.


0 Comments