शंभू उंबरगा येथील श्री महादेव मंदिरास तीर्थ स्थळाचा ' ब ' दर्जा प्रदान
उदगीर : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना 'ब' दर्जा देण्यात येतो. उदगीर तालुक्यातील शंभू उंबरगा येथील श्री महादेव मंदिरास महाराष्ट्र शासनाच्या तीर्थ क्षेत्राचा ' ब ' दर्जा प्रदान करण्यात आला असल्याची माहिती या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर तालुक्यातील शंभू उंबरगा येथील श्री महादेव मंदिर हे परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून पुरातन काळापासुन नवसाला पावणारा श्री महादेव म्हणून या मंदिराची आख्यायिका असुन आंध्रा, कर्नाटक, तेलगंणा या राज्यातून भाविक भक्त येथे येवून दर्शन घेत असतात. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असुन दर सोमवारी अन्नदान करण्याची गेल्या अनेक वर्षापासुनची परंपरा आहे. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या श्री महादेव मंदिराचा ९ एकरचा परिसर आहे. भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने या श्री महादेव मंदिराला येवून मनोभावे पूजा करतात म्हणून
या महादेव मंदिराला तीर्थ क्षेत्राचा ' ब ' दर्जा मिळावा यासाठी परिसरातील भाविकांनी ना.संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा विचार करुन राज्य शासनाकडे ना.बनसोडे यांनी पाठपुरावा करुन तो मिळवला असल्याने पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments