Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पथनाट्यातून व्यसनमुक्ती विषयी जनजागृतीदारूबंदीसाठी ग्रामपंचायतचा ठराव तर महिलांनी राबविली स्वक्षरी मोहीम

पथनाट्यातून व्यसनमुक्ती विषयी जनजागृती
दारूबंदीसाठी  ग्रामपंचायतचा ठराव तर महिलांनी राबविली स्वक्षरी मोहीम

देवणी, तालुक्यातील चवणहीप्परगा येथे व्यसनमुक्ती व दारूबंदीसाठी  मातृभूमी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली तर गावातील महिला मुलींनी रॅली काढत दारूबंदी एल्गार रॅली काढली . गावातील तरुण पिढी  दारुच्या आहारी जात असल्याने
चवणहिप्परगा ग्राम पंचायत व बब्रुवान पाटील यांच्या माध्यमातून  
 मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून व्यसनमुक्ती व दारूबंदी विषयी जनजागृती केली. तसेच गावातील महिला मुलिंनी हातात दारुबंदीचे फलक घेत एल्गार रॅली काढत व्यसनमुक्ती व दारु बंदीविषयी  आवाज उठवला.
रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गावातील प्रत्येक रस्त्यातून निघत  ग्रामपंचायत कार्यालय  येथे समारोप करण्यात आला 
रॅलीत गावातील महिला पुरुष शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते रॅलीचे उद्घाटन मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, बब्रुवान पाटील सामाजिक कार्यकर्त्या कुशावर्ता बेळे सरपंच शकुंतलाबाई मोरे यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच इस्माईल शेख ,बालाजी पिलगुरे तुकाराम बिरादार दिलीप विटाळे सत्वशीला कांबळे सविता कांबळे तुळशीराम तेलंगे चांदपाशा शेख राजश्री बिरादार पोलीस पाटील प्रदीप पाटील ग्रामसेवक एस बी अडसुळे माधव मोरे राहुल गुरमे योगेश पल्लेवाड नाना पाटील राजेंद्र पिलगुरे राहुल पाटील संजीव गणेश पुरे हर्षराज कांबळे प्रा ओंकारे  आदीची उपस्थिती होती पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन मातृभूमी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले होते पथनाट्यात वैभवी वराळे तेजस्विनी सूर्यवंशी दामिनी धनवे वैष्णवी सूर्यवंशी नागेश सुळकेकर अरुण राठोड प्रदीप माळगे शुभम मादळे गौरव कोंगे  धूर्वेश गोटमुकले,रोहित  कांबळे तर संगीत योजन धम्मदीप  तिगोटे व देवरुप कांबळे यांनी केले .
ग्रामपंचायत ने घेतला दारूबंदीचा ठराव चवण हिप्परगा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दारूबंदीचा ठराव घेण्यात आला यावेळी दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी  स्वाक्षरी मोहिम राबविली

Post a Comment

0 Comments

जाहिरात