*नामदार मंत्री महोदय संजयजी बनसोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार*
उदगीर: दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत नामदार मंत्री महोदय संजयजी बनसोडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथपूर येथील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शालेय प्रतिनिधी म्हणून श्री कळसकर सर तेथे विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. याप्रसंगी उदगीर शहरातील तसेच उदगीर ग्रामीण भागातील सर्व शालेय विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री महोदय संजयजी बनसोडे यांनी उदगीर शहरात क्रीडा संकुल येथे सर्व सर्व खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले,विद्यार्थ्यांना आनंदाची बाब म्हणजे येत्या 29 ते 31 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय युवक महोत्सव उदगीर शहरात होणार आहे याप्रसंगी सर्व शालेय विद्यार्थ्यांनी तेथे जास्तीत जास्त संकेत यावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
0 Comments