नामदार संजय बनसोडे क्रीडा मंडळाच्या बोधचिन्हाचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते अनावरण
उदगीर : “ मंत्री चषक २०२४” अखिल भारतीय डे - नाईट फुटबाॅल स्पर्धा येत्या १४ ते २० जानेवारी २०२४ मध्ये तालुका क्रीडा संकुल जिल्हा परिषद येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत देशातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत. याच धर्तीवर नामदार संजय बनसोडे क्रीडा मंडळाच्या वतीने क्रीडा मंडळाचा बोधचिन्ह (लोगो) चे अनावरण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या शुभ हस्ते शासकीय विश्रामगृह , उदगीर येथे करण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून उदगीर परिसरातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्रालायचा नामदार संजय बनसोडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मतदार संघातील क्रीडा प्रकल्प व विविध सामन्यांचे आयोजन सातत्याने होत आहे नोव्हेंबर महिन्यापासुन उदगीरमध्ये राज्यस्तरीय फुटबाॅल, डॉज बाल सह विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. जानेवारी - २०२४ मध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तर १४ ते २० जानेवारी २०२४ या कालावधित 'मंत्री चषक' अखिल भारतीय डे - नाईट स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २,७१,१११/- रोख रक्कम व सन्मान चिन्ह व्दितीय पारितोषिक १,७१,१११/- रोख रक्कम व सन्मान चिन्ह , तिसरे पारितोषिक ४१,१११/- व रोख रक्कम व सन्मान चिन्ह , तर चौथे पारितोषीक ३१,१११ रोख व सन्मानचिन्ह तसेच मॅन ऑफ दि सिरीज, बेस्ट गोलकीपर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट फारवर्ड, बेस्ट मिड फिल्डर यांना सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी ५०००/- रुपये रोख व प्रत्येक सामन्यातील मान ऑफ दि मॅच यास ११००/- रोख रक्कम देण्यात येणार आहे. यावेळी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शेख फय्याज, उपाध्यक्ष शेख निझाम,सलीम परकोटे कार्याध्यक्ष, बाळसाहेब मारलापल्ले, समन्वयक अहमद सरवर , सचिव शेख इफ्तेखार, सह सचिव अनिल मुदाळे, परवेज खाद्री, मंडळाचे मार्गदर्शक समीर शेख,सदस्य प्रवीण भोळे, प्रा.शाम डावळे,सय्यद जानिमियां, शेख अतिक, शेख, यासेर शेख,फुर्खान रिझवान,महबूब मुल्ला, इब्राहीम क़ुरेशि,अरबाज अस्फी,अखीब शेख, शेख अब्दुल समद, आदीसह क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
0 Comments