उदगीरात काल अक्षता कळसाची भव्य शोभा यात्रा संपन्न
उदगीर - हिंदुचे आराध्य दैवत श्रीराम यांची आयोध्येमध्ये दि.२२ जानेवारी २०२४ रोजी प्राणतिष्ठापणा होणार आहे या निमित्त संपूर्ण देशभर आनोंदत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आयोध्या येथून मंत्रोग्ध झालेली अक्षता कळस, श्रीराम प्रतिमा व पत्रक काल दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी लातूर संघ कार्यालय येथून उदगीर शहर व ग्रामीणसाठी विश्व हिंदू परीषदेचे उदगीर शहर अध्यक्ष महादेव घोणे व मंत्री श्रीपाद करंजीकर यांनी दुपारी ४.३० वा . दुधिया हनुमान येथे घेऊन आले व हभप उद्धव हैबतपूरे, सांतोष कुलकर्णी व सौ. शितल घोणे यांच्यावतीने दोन्ही कळसाची विधिवत पूजा व आरती करून सर्व हिंदू प्रेमींच्या वतीने जय श्रीरामाच्या घोषणा देत भाव्य स्वागत करण्यात आले.
दुधिया हनुमान मंदिरात भाजपा शहर संघटन सरचिटणीस आनंद बुंदे व गिरीष गर्जे यांना सपत्नीक पूजेला बसवून पुजारी रामराव जोशी यांनी कळस पुजा केली. यानंतर सायं. ५ वा. दुधिया हनुमान ते श्रीराम मंदिर जळकोट रोड पर्यंत आरएसएस, विश्व हिंदू परीषद, बजरंग दल, भाजपा शहर व ग्रामीण, श्रीराम प्रतिष्ठाण व शहरातील महिला भजनी मंडळ टाळ मृदगांच्या गजरात श्रीरामाच्या घोषणा देत सर्व भक्तांसह भव्य शोभा यात्रा काढण्यात आली यामध्ये ला . ब . प्रा. विद्यालयाचे शिक्षक केंद्रे व बाणापूरे यांनी इ. ४ थी वर्गातील मुला मुलींना श्रीराम , सीता, हनुमान , महादेवाच्या वेशभूषेतील पात्रासह सहभाग नोदवला .
यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा उदगीर शहर अध्यक्ष मानोज पुदाले , माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, संघाचे प्रमोद कुलकर्णी, डॉ. प्रशांत राजूरकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हासह मंत्री सचिन जळकोटे, विश्वनाथ गायकवाड,नगर सेवक अँड. दत्ता पाटील, सावन पसनापुरे, लाखन कांबळे, उदगीर भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, सोमनाथपूर ग्राम पंचायत सदस्या शिवकर्णा अंधारे, माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, शहर उपाध्यक्ष सतिश उस्तुरे, लातूर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल निडवदे, राजकुमार देशमुख , माधव टेपाले, आनंद महामुणी, विष्णू लोणीकर, शुभम लोणीकर,रमेश सदानंदे,उदगीर तालुका अ.जा. मोर्चा अध्यक्ष नवज्योत शिंदे, आनंद साबणे, सुनील गुडमेवार, रामेश्वर पवार, विनायक सुर्यवंशी,पप्पु गायकवाड, नटवर सकट, विश्वनाथ धोरजे, अनिल मुदाळे सचिन मोहिते, दयानंद बन, व्यंकट काकरे, महेश खेडकर, सति उप्परबावडे हे उपस्थित होते .
ही शोभा यात्रा उदगीर शहरातील दुधिया हनुमान येथून निघून श्रीराम मंदिरा पर्यंत काढण्यात आली . यावेळी श्रीराम मंदिर येथे नागेश अंबेगावे, सचिन मोहिते, सतीश चव्हाण यांनी सपत्नीक कळस पुजा केली व प्रसाद वाटप करण्यात आले .
या शोभा यात्रेचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठाणच्या वतीने सतिश पाटील, शहर अध्यक्ष मनोज पुदाले, अभिजीत पाटील, प्रशांत मांगूळकर , आशिष अंबरखाने , सावन टंकसाळे , निखिल पाटील, कल्लप्पा स्वामी, राजेश शेटकार ,अजय नवरखे ले, अक्षय जाधव ,चैतन्य बोईनवाड,पप्पू यादवराव गायकवाड , विवेक मदनुरे,विष्णू लोणीकर नितीन शिरसे,अभय सार्थक जीम यांनी केले होते.
0 Comments