अवैध दारूची वाहतूक करणारी कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात
उदगीर:राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप-आयुक्त उषा वर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्कचअधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर विभागाने 16 डिसेंबर रोजी उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे देशी दारूची अवैध वाहतूक करणारी टाटा कंपनीची कार व 72 लिटर देशी दारू असा एकूण 4 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून एक गुन्हा दाखल करण्यात आला. व दोन आरोपीना अटक करण्यात आली, मोहिमेतंर्गत एकूण 39 गुन्हे नोंद केले. त्यामध्ये 40 आरोपींना अटक करण्यात आली.
नागरिकांना नाताळ व नविन वर्षाच्या स्वागत दरम्यन धाब्यावर मद्यप्राशन केल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
गुन्हा अन्वेषण व्यतिरिक्त हातभट्टी मुक्त करण्यासाठी प्रत्येक अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जावचून हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत गावात ग्रामसभा घेण्याबाबतचे पत्र देण्यात आले.सर्व खेडोपाडी जावून गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देवून हातभट्टी दारु निर्मित करणारे, वाहतूक करणारे व विक्री करणाऱ्या इसमांची व ठिकाणांची माहिती देण्याबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 134 ची नोटीस देण्यात आल्या व हातभट्टी समुळ उच्चाटन करण्यासाठी गावे दत्तक घेतली आहेत. या कारवाईमध्ये लातूर विभागाचे निरीक्षक आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक आर.एम. जाधव, एल. बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्नील काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. बी. जाधव, गणेश गोले, निलेश गुणाले, मंगेश खारकर तसचे जवान अनिरुध्द देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, एस. जी. बागेलवाड, संतोष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांनी सहभाग नोंदविला.
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास 18002339999 या टोल फ्री क्रमांक अथवा लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांचे नांव गुप्त ठेवले जाईल,असे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत यांनी कळविले आहे.
****
0 Comments