तोंडार पाटी येथे कार व स्कुटीचा अपघात एक जण जागीच ठार तर एक जखमी
उदगीर:तालुक्यातील तोंडार पाटी नांदेड बिदर रोडवर कार व स्कुटीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली सूत्रांनी दिलेली माहिती अशी कार क्रमांक एम.एच.24 बी.आर.9161 ही उदगीर कडून नांदेडकडे जात असताना व टी.एस.11 ई.एक्स.1580 स्कुटी उदगीरकडे येत असताना या वाहनांचा तोंडार पाटीजवळ अपघात झाला या अपघातात स्कुटीस्वार जागीच ठार झाला आहे.तर एक व्यक्ती जखमी झाला असून उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात शेख मुजाहीद सरदारसाब वय 42 राहणार मुसा नगर उदगीर यांचा जागीच मृत्यू झाला.तर शेख फिरदोस शरफोद्दीन वय 29 वर्ष राहणार पीर मुसा नगर उदगीर हे किरकोळ जखमी झाले.
0 Comments