नागलगाव परिसरात ग्रामीण पोलिसांचे तीन ठिकाणी छापे हजारो लिटर गावठी दारू व रसायन जप्त
उदगीर:तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकून हजारो रुपयांची गावठी हातभट्टी दारू व रसायन जप्त करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर तालुक्यातील नागलगाव परिसरात अवैध हातभट्टी दारूची विनापरवाना चोरटी विक्री होत असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप पांडुरंग भागवत व ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नागलगाव परिसरात तीन ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारूवर छापे टाकून 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल संध्या नागेश कुलकर्णी,पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव व्यंकटराव धुळशेट्टे,पोलीस अंमलदार परमेश्वर यादवराव वागदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस तिघांवर कलम 65 (ड) ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत 14 डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास बिट जमादार नामदेव व्यंकटराव धुळशेट्टे हे करीत आहेत.या कारवाईमुळे अवैध हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
0 Comments