मदिना नगर येथे शहर पोलिसांनी ५ लाख २७ हजारांचा गुटखा पकडला,तिघांवर गुन्हे दाखल
उदगीर:शहरातील जळकोट रोड मदिना नगर परिसरात अवैध गुटख्याची वाहतूक करणारा एक पिक अप टेम्पो व कार शहर पोलिसांनी 14 डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेतली असून पाच लाख सत्तावीस हजारांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मदिना नगर भागात आरोपीने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गीतांजली, सागर,नजर गुटख्याची वाहतूक करीत असताना टेम्पो क्रमांक एम.एच.४७ वाय ६३१६ व कार क्रमांक एम.एच.२४ ए.एफ.५२४३ या वाहनांना ताब्यात घेतले असता पाच लाख सत्तावीस हजारांचा गुटखा दोन्ही वाहनांची अंदाजित किंमत दहा लाख रुपये असा एकूण पंधरा लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन अन्न भेसळ अधिकारी विठ्ठल सटवजी लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अजहर पटेल,हमीद पटेल,जफर पटेल यांच्यावर गुरन ३४६/२३ कलम १८८,२७२,२७३,३२८,३४ भादवी व अन्न सुरक्षा कायदा २००६ कलम ५९ नुसार १५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
0 Comments